बातमी
श्रीमद् भागवत कथा, श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह - तीर्थक्षेत्र आळंदी, दि. १३/१२/१५ ते दि. २०/१२/१५., दरोराज प्रवचन दुपारी २.०० ते ५.००., स्थळ : ह. भ. प. तोताराम महाराज मठ, आळंदी माउली सत्संग व्यसनमुक्ती पारिवार

माउली सत्संग व्यसनमुक्ती पारिवार आपले स्वागत करीत आहे


विदर्भ भूमीत राहून म. गांधी आणि संत विनोबाजी भावे यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला.सतः झाडले आणि स्वच्छतेला चालना दिली. त्याच काळात वैराग्य-मूर्ती संत गाडगे बाबांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी शुद्धीचा वसा हाती घेतला. गाडगे बाबा आयुष्य भर झाडत राहिले. तुकडोजी महाराज भजनान व्दारे अज्ञान काढीत राहिले. सातत्याने विदर्भात शुद्धीचे कार्य वाढत राहिले.प्रबोधनाकरिता गाडगे बाबांनी खराट्याचे मध्यम घेतले. तुकडोजी महाराजांनी खंजेरीचे सह्य घेतले. खराटा आणि खंजेरीला व्यसनमुक्ती सम्राट खोडे उर्फ खराटे महाराजांची झोळी येउन मिळाली आणि समाजाचा अंतःबर्ह्या शुद्धीला चालना मिळाली. मधुकर महाराज खोडे यांचा खराटा गाव शुद्ध करू लागला. खंजेरी भाव शुद्ध करू लागली. व झोळी व्यसन मुक्तीचे दान घेऊ लागली. एकेक बिघडलेला मनुष्य भानावर येऊ लागला. शुद्ध सात्विक जीवन जगू लागला. खोडे बाबांनी खराटा-खंजेरी आणि झोळीचा त्रिवेणी संगम जुळवून आणला. मधुकर महाराज सुधारक संताची स्मृती जागृत करतात. आणखी.....
महाराजांचे विचार
 • एका स्त्री चा किंवा एका पुरुषाचा राग शांत झाला तर पूर्ण कुटुंबात आनंद (कृष्ण) खेळतो. एका घरातील व्यसन सुटल म्हणजे एक
  पडलेल मंदिर उभ झाल अस समजाव. अशा मानवमंदिर निर्माण कार्याचे वाटेकरी व्हा.
  ....कर्मयोगी संत: श्री मधुकर खोडे महाराज
 • व्यसनमुक्त माणूस समाज मंदिराचा खांब असतो.
 • आत्मशक्ति पुढे दुष्प्रवृतीचे आक्रमण होत नसते
 • सुख उपलब्ध होणारी वस्तु नव्हे राग आणि आग विनशाच्या दोन बाजू आहेत.
 • शांतीने क्रोधाचा पारा खाली येतो.
 • मी काही ज्ञानी नाही, पंडित नाही, दीव्यावरची काजळी काढणे म्हणजे ग्रामसफाईत जीवन शुध्दीचा लाभ घडतो....संत श्री मधुकर खोडे महाराज
 • दारू सोडा, देव जोडा, व्यसन सोडा, सुख जोडा
 • व्यसन कोणत्याच धर्माला आवडत नाही.
 • दारू विकणारा खातो तुपाशि आणि पिनारा मारतो उपाशी.
 • दारू सोडा देव जोडा.
 • इकडे पेरल तिकड कापल,अस कोणते पीक आहे? चोरी,लबाडी,भ्रष्टाचार.
 • ....संत श्री मधुकर खोडे महाराज
  मनोगताचा प्रसाद
  प्राचार्य देवेंद्र राऊत
  १ फेब. २०१३नागपूर
  खोडे उर्फ खराटे महाराज हे माणसाला माणुसकी शिकीविणारे संत आहे. त्यांनी गाडगेबाबच्या कार्याला प्रचंड गती दिली.
  श्रीमती सुनंदा लांबट
  १ फेब. २०१३नागपूर
  " हरी ओम माऊली हरी ओम " खोडे माऊली बद्दल काय लिहावे सुतच नाही. सर्वात पहिले भागवत नागपूर जवळ शिवन गावला झाले. तेव्हा माझा भाऊ किशोर मेंदुळे रा. राजुरा. तो आला व त्याच्या मुळे मला खोडे महाराजांचे दर्शन घडले
  श्री रमेश कचरे महाराज
  १ फेब. २०१३फुबगावाचे
  पोथीची समाप्ती होते परंतु खोडे महाराजांच्या सप्ताहाचा शेवट होत नसतो. त्यांच्या कार्याची सुरवात काल्या नंतर होते.